नियमित अपडेट

सदस्यता

ग्रुपमध्ये सामील व्हा
  • सदस्यता
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • होम
  • ज्ञान
  • संशोधन
  • ब्लॉग
  • व्यवसाय संधी
  • नोकरी संधी
  • संपर्क करा
  • सदस्यता

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प उभा राहणार – मंत्री छगन भुजबळ

१८ ऑक्टोबर २०२५ रोजी येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यालयाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन.  येवला बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी १.५० कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीने तातडीने सादर करावा. यासोबतच कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत असलूयाचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सहायक निबंधक श्री.राजपूत, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुणमामा थोरात,    वसंत पवार, संभाजी पवार, येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, रायभान काळे, माजी सभापती किसन धनगे, संचालक संजय बनकर यांच्यासह सभासद, नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण व्हावे, त्यांना योग्य भाव मिळावा, त्यांचे उत्पादन सुरक्षित राहावे ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे. येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचा डोंगरगाव येथे उपबाजार सुरु करण्यात आला आहे. या उपबाजारासाठी आवश्यक ती जमीन आपण उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता बाजार समितीपर्यंत दुरचा प्रवास करावा लागणार नाही. त्यांना त्यांच्या भागातच बाजारपेठेची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर अंदरसूल उपबाजारात कांदा लिलाव स्थळाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यात शेतमाल भिजून नुकसान होऊ नये यासाठी निवारा शेडची कामे देखील सुरु आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टळेल आणि व्यवहार सुरळीत पार पडतील असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

येवला तालुक्याचा कृषी माल केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागात पोहोचावा, यासाठीही आपले प्रयत्न सुरु आहे. यासाठी येवला आणि नगरसूल रेल्वे स्थानकात “गुड्स शेड” उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. कृषी माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेला येवला स्थानकातून अधिक बोग्या जोडून गाड्यांना थांबा मिळावा यासाठी देखील आपण रेल्वे प्रशासनाकडे  सातत्याने पाठपुरावा करत आहोत. हा निर्णय झाला की, शेतकऱ्यांचा माल थेट इतर राज्यांपर्यंत पोहोचेल, वाहतूक खर्च कमी होईल आणि त्यांना अधिक नफा मिळेल. शेतमाल साठवणुकीचा प्रश्नही आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. यासाठी पणन विभागाच्या माध्यमातून मोठ्या गोदामांची उभारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची दीर्घकाळ सुरक्षित साठवण करण्याची सुविधा मिळेल. कांद्याला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली व्यापारी प्रतिनिधींसोबत बैठक

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधींची त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांबाबत निवेदन मंत्री छगन भुजबळ यांनी स्वीकारून शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी आश्वस्त केले

  • Oct 25, 2025
  • शासन


इतर बातम्या
शासन
शासन
शासन
शासन
शासन
शासन
शासन

Share:

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp

Agri Trade Media(ATM) कृषी व्यापार आणि उद्योगांसाठी फायदेशीर सामग्री प्रकाशित करते जे जमिनीत कष्ट करणाऱ्या आणि गाळणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतात. आम्ही निर्माते आणि उत्पादक, डीलर्स आणि अर्थातच शेतकरी यांच्यातील पूल म्हणून काम करतो. शेतीवर दबाव वाढत आहे. हे प्रश्न शेतकरी, कृषी उद्योग आणि धोरणकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालत आहे.

वृत्तपत्र

कृपया आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

Useful Links

  • संशोधन
  • ज्ञान
  • शासन
  • जॉब ऑफर
  • सदस्यता
  • माहिती

Copyright © All rights reserved | Agro Trade Media

  • Terms of use
  • Privacy Policy
  • Contact