देशासह राज्यात आज अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शने भरविली जात आहेत. परंतु किसान हे कृषी प्रदर्शन गेल्या तीस वर्षांपासून पुणे येथे आयोजित केले जात आहे. शेतकरी आणि कृषी उद्योगांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या या प्रदर्शनाची व्याप्ती खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार पाहता किसान प्रदर्शनाच्या आयोजकांनीही तंत्रज्ञानाची कास धरून अनेक बदल घडवून आणले आहेत. किसानच्या प्रवासाबद्दल माहिती देत आहेत, आयोजक निरंजन देशपांडे.