अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पाण्यात भिजून गेला असल्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये आला नसल्यामुळे त्याची आवक घटली परिणामी भाज्यांचे दर वाढले.
अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. फळांच्या बागा पाण्याखाली गेल्या होत्या. नाशिक, निफाड तालुका तसेच परिसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. गारपिटीमुळे द्राक्षांचे घड गळून पडले होते. द्राक्ष पिकाचे १०० टक्के नुकसान झाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे गणित बिघडले. हातातोंडाशी आलेले द्राक्षाचे पीक पाण्याखाली गेले होते. परिणामी द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.
फळांना पाणी लागल्याने फळे कुजण्यास सुरुवात झाली. कोकणातील आंब्याचा मोहर गळून पडला असून त्याचे परिणाम फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम पाहता उत्पादनात घट होईल. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, ऊस, कांदा, भाजीपाला अशा अनेक पिकांचे नुकसान झाले. विदर्भ, मराठवाड्यात तूर, कापूस, हरभरा आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातल्या बहुतांश भागाला बसला. अतिपावसामुळे शेतातील कापसाची बोंडं खाली गळून पडली.रबी हंगामातील ज्वारी, गहू पिकांनाही पावसाचा फटका बसला. ज्वारीची कणसं मातीत मिसळली होती. या सर्व पिकांची अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली होती. एकूणच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेले भात, ज्वारी, गहू, हरभऱ्यासह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले.
अवकाळी आणि गारपीट पासून द्राक्षबाग वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरचा यशस्वी प्रयोग
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक, निफाडमधील द्राक्षबागेचे नुकसान झाले. नाशिक जिल्हा,दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कमानकर यांनी द्राक्षबागेत क्रॉप कव्हरचा यशस्वी प्रयोग केला असून त्यामुळे अवकाळीपासून द्राक्षबाग वाचविण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या द्राक्षांचे गारपीट आणि वादळामुळे कुठलेही नुकसान झालेले नसून द्राक्ष पूर्णतः सुरक्षित राहिले आहेत. गारा क्रॉप कव्हरवर पडल्या आणि पाणी खाली गळून पडले.
झुलूक कॉर्पेरेशनचे प्रो पॅनलचे डिझाईन
झुलूक कॉर्पेरेशनने प्रो पॅनल हे द्राक्षबागेच्या आच्छादनासाठी कमी खर्चामध्ये डिझाईन केले आहे. हे सुधारित वाय स्ट्रक्चरसाठी असून दोन गल्लीतील अंतर व दोन वाय मधील अंतर यांच्या मापानुसार हे पॅनल बनवले जातात. पारंपारिक मांडव पद्धतीसाठी असून प्लॉटच्या माप व आकारानुसार मांडवाच्या बाहेर आधारस्तंभ उभे करून संपूर्ण प्लॉटवर आच्छादन केले जाते.