एटीएम न्यूज नेटवर्क : सिजेंटा इंडियाने सॅपरेस (SapRaise™) लाँच करण्याची घोषणा केली, एक स्मार्ट सीडलिंग सोल्यूशन जे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात परिवर्तनीय बदल घडवून आणेल. हे नाशिक आणि पुणे येथील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार भाजीपाला रोपांचे उच्च तंत्रज्ञान संसाधन तयार करेल.
फलोत्पादनात नाशिक अग्रेसर आहे, नाशिक हे आशियातील सर्वात मोठी टोमॅटो मंडई आहे, नाशिकमध्ये ८०,००० एकरवर टोमॅटो, ३०,००० एकरवर फ्लॉवर, २,५०० एकरवर टरबूज आणि १०,००० एकरवर मिरची आणि शिमला मिरचीची लागवड होते.
ओम गायत्री ग्लोबल सीडलिंग्सच्या सहकार्याने सॅपरेस तंत्रज्ञानाचे पदार्पण हे नाशिक आणि पुणे जिल्ह्यात आले आहे. ही हाय-टेक रोपवाटिका रोपे उत्पादनात एक उत्कृष्ट केंद्र म्हणून काम करेल आणि सिजेंटा कंपनीच्या यंग प्लांट रायझर्स (YPR) सोबतच्या धोरणात्मक भागीदारीचा ठसा उमटवेल.
सॅपरेस सपोर्ट नाशिक आणि पुण्यातील मोठ्या संख्येने भाजीपाला शेतकऱ्यांसाठी तयार केले गेले आहे, यामुळे पीक गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते. आमचे केंद्र उत्पादकांना उच्च-गुणवत्तेची, निरोगी रोपे देईल. यामुळे उत्कृष्ट पीक उत्पादन आणि वाढीव उत्पन्न मिळविण्याची सर्वोत्तम सुरुवात होईल. नुकताच नाशिक येथील उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे सिजेंटा इंडिया नंतर देशभरातील सॅपरेस उत्कृष्टता केंद्राचा विस्तार करण्याची योजना आखत आहे, ज्याचा उद्देश सर्व राज्यांतील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे आहे.
सिजेंटा इंडियाचे व्हेजिटेबल सीड्स विभागातील टेरिटरी बिझनेस हेड संजय कुमार सिंग म्हणाले कि, कृषी व्यवसायाच्या गुणवत्तेला चालना देण्याबरोबरच हे एक्सलन्स सेंटर विद्यमान भागीदारांच्या विक्रीची व्याप्ती वाढवेल, त्या त्या भागातील स्थानिक भाजीपाला उत्पादकांना उत्तम दर्जाची रोपे मिळवता येईल. या विस्तारामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतींचा लाभ घेता येईल. सॅपरेसचे उद्दिष्ट महाराष्ट्रासाठी एक मॉडेल उपक्रम म्हणून रोपांच्या गुणवत्तेसाठी आणि कृषी नवकल्पनांसाठी एक नवीन मानक स्थापित करणे आहे. "ओम गायत्री ग्लोबल आणि आमच्या भागीदारांसोबतचे आमचे सहकार्य एक्सलन्स सेंटरद्वारे शेतकऱ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि संसाधने पुरवून कृषी क्षेत्रातील परिदृश्य बदलण्यासाठी सहकार्य राहील असल्याचेही सिंग म्हणाले.
लाँच इव्हेंटमध्ये सॅपरेस प्रणालीचे प्रात्यक्षिक आणि शेतकऱ्यांना रोपांच्या तंत्रज्ञानातील माहिती तज्ञांकडून थेट शिकण्याची संधी दिली होती. या उपक्रमात नाशिक आणि पुण्यातील ३०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते, या कार्यक्रमाला टेरिटरी हेड संजय कुमार सिंग, सिंजेंटाचे वित्त विभाग प्रमुख मीनल माहेश्वरी, पीक संरक्षण विकास विभागाचे विनोद शिवरेन, उत्पादन आणि पुरवठा विभागाचे माधवानंद काशीद आणि ओम गायत्री नर्सरीची टीम उपस्थित होती.