एटीएम न्यूज नेटवर्क : वॉलमार्ट फाऊंडेशनकडून विविध सामाजिक उपक्रमांतर्गत भारतातील कृषी क्षेत्राला २७.८ लाख डॉलर्सचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
या माध्यमातून नॅशनल आंत्रप्रेनरशिप नेटवर्क (एनईएन), टाटा कॉर्नेल इन्स्टिटयूट ऑफ ऍग्रीकल्चर अँड नुट्रीशन (कॉर्नेल विद्यापीठ) आणि प्रिसिजन डेव्हलपमेंट या संस्थांनी देशातील तीन लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.
या संस्थांनी आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, कृषीमालाला बाजारपेठेत संधी मिळवून देणे, तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत.
शेतीचा विकास करायचा असेल तर छोटे शेतकऱ्यांचा विकास करणे महत्वाचे आहे. आमच्या आर्थिक मदतीतून आणि वरील तिन्ही संस्थामार्फत शेतकऱ्यांसाठी एक उत्तम व्यवस्था निर्माण होईल असे वॉलमार्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्ष जुली गिरकी यांनी म्हटले आहे.