एटीएम न्यूज नेटवर्क : निफाड तालुक्यातील उगांव येथील एस.व्ही.सी.शेतकरी उत्पादक कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी १३२ इस्त्राईल टेक्नॉलॉजी पॉलीहाउस प्रोजेक्ट राबवला जाणार असल्याची माहिती संचालक खंडेराव मापारी यांनी दिली.
प्रोजेक्टला दिड एकर जागा
या प्रोजेक्टविषयी अधिक माहिती देतांना श्री. मापारी म्हणाले कि, या पॉलीहाऊस प्रोजेक्टला दिड एकर जागा लागणार असून या प्रकल्पासाठी येणारा संपूर्ण खर्च कंपनी करणार आहे. शेतकऱ्याच्या नावावरती कुठलेच लोन होणार नसून शेतजमिनीवर कुठलाच बोजा चढवला जाणार नाही.
सर्व संसाधन कंपनीद्वारे पुरवले जाणार
पॉलीहाऊस करार शेतीचे रजिस्टर ऍग्रिमेंट १५ वर्षाचे असून पाण्याचे रिपोर्ट तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट, कच्चे ऍग्रिमेंटचा खर्च हा शेतकऱ्याने करावयाचा आहे. कंपनी पॉलीहाऊसमध्ये विविध पिकांची दोन किंवा तीन लागवड चक्रानुसार लागवड करणार असून त्यासाठी रोपे, बियाणे, खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक कीडनाशक, असे सर्व संसाधन कंपनीद्वारे पुरवले जाईल.
शेतकऱ्याला प्रति वर्ष ७ लाख रुपये मानधन
सुरवातीला कच्चे ऍग्रिमेंट बनविल्यानंतर रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर ऍग्रिमेंट होईल. या कामासाठी २ ते ५ लाखापर्यंत खर्च असून तो खर्च कंपनी करणार आहे. पॉलीहाऊसमध्ये पाणी कमी पडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याला प्रति वर्ष ७ लाख रुपये जमिनीचे मानधन राहिल कंपनीने दिलेले औषधे आणि सांगितलेले नियोजन तसेच काम जर शेतकरी वेळेत करू शकला नाही तर मानधनातून १० टक्के कपात होईल.
कंपनी काढणार पॉलीहाऊसचा विमा
दिड एकर जागेत १ एकराचे पॉलीहाऊस तसेच ५ गुंठ्याचे शेततळे आणि सोलर पॅनल ऑटो सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण दिड एकरला जाळीचे कंपाऊंड बसवणार असल्याची माहिती श्री. खंडेराव मापारी यांनी दिली. कंपनी पॉलीहाऊसचा विमा काढणार असून भविष्यात कुठल्याही प्रकारचे संकट (गारपीट, लॉकडाऊन, अतिवृष्टी ) झाल्यास अथवा काम बंद पडल्यास कंपनी ठरलेल्या मानधनाच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्याला देण्यास बंधनकारक असल्याचे श्री. मापारी यांनी सांगितले.
कंपनीला सबसिडी देण्याची शेतकऱ्याची जबाबदारी
कंपनीला सदर पॉलीहाऊस कामामध्ये गव्हर्मेंटची सबसिडी मिळणार आहे. ती सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. सबसिडी वर्ग झाल्यानंतर शेतकरी सदर प्रकल्प बनवण्याऱ्या कंपनीला सबसिडी देण्याची संपूर्ण जबाबदारी शेतकऱ्याची असून हे सर्व मुद्दे रजिस्टर अग्रीमेंटमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी व कामगारांना कंपनीकडून प्रशिक्षण
कंपनी स्वतःचे कोल्ड स्टोअरेज उभारणार असून कंपनी पिकासाठी औषधे, रोपे पुरवणार असून शेतकरी व त्याच्या कामगारांना कंपनीकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी एस.व्ही.सी.फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., मु.पो. उगांव, ता. निफाड, जि. नाशिक (महाराष्ट्र), पिन- ४२२३०४, मोबा.- ७३८७७८७७९९ यावर संपर्क करावा.