एटीएम न्यूज नेटवर्क : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडी चिंता करायला लावणारी बातमी आहेे. लांबलेल्या मॉन्सूनमुळे राज्यातील 2022-23 चा गळीत हंगाम किमान पंधरवड्याने लांबण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीनंतर राज्यात साखरेचे पुन्हा विक्रमी उत्पादन झाले आहे. गळीत हंगामास विलंब झाल्यास त्याचे राजकीय आणि प्रशाकीय पातळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहेे.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, आम्हाला 1 ऑक्टोबरपासून उसाचे गाळप सुरू करायचे होते. मात्र, सरकारने 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याची परवानगी दिली. पाणी साचलेल्या शेतात काढणी करणे शक्य नसल्याने आता गाळप सुरू करणे कठीण आहे.
जर ऊसाखालील क्षेत्र समान असेल, तर गतवर्षी प्रमाणेच आम्हाला मागील वर्षीप्रमाणेच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले.
यापुढे पाऊस पडला नाही, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कारखान्यांचे कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा आहे, असे कोल्हापूरचे व्यापारी घोरपडे यांनी सांगितलेय. लांबलेला पाऊस उसाचे प्रति एकर उत्पादन वाढवण्यासाठी चांगला आहे.
(स्रोत- इकॉनॉमिक्स टाइम्स)