एटीएम न्यूज नेटवर्क ः हवामानातील बदलामुळे वाढणारे तापमान आणि पर्जन्यमानात होणारे बदल यामुळे कृषी क्षेत्रात नवीन कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) च्या मते, उष्ण तापमानामुळे कीटक जगू शकतात आणि जलद गतीने पुनरुत्पादित होतात. या समस्येला प्रतिसाद म्हणून भारत सरकारने नवीन तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश असलेले अनेक उपक्रम सुरू केले आहेत. हे उपक्रम शेतकऱ्यांना कीटक ओळखण्यात आणि नियंत्रित करण्यास मदत करतात.
याच पृष्ठभूमीवर पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा. लिमिटेडने एक अतिशय नावीन्यपूर्ण कीटकनाशक तयार केले आहे. या कीटकनाशकामुळे पतंग किंवा फुलपाखरांवर (पंख असलेल्या कीटक) चांगले नियंत्रण मिळवता येते. भारत सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या रासायनिक सूत्रीकरणाचे पेटंट मंजूर केले असून, मक्यावर प्रादुर्भाव होणाऱ्या लष्करी अळीसाठी अधिकृतपणे शिफारस केलेले हे पहिले कीटकनाशक आहे.
वेलेक्टिन (VELEKTIN) असे या कीटकनाशकाचे तांत्रिक नाव आहे. पतंग किंवा फुलपाखरे (पंख असलेल्या कीटक)वर नियंत्रण मिळविण्यासाठी वेलेक्टिनचा उपयोग होतो. मक्याव्यतिरिक्त कापूस, मिरची आणि सोयाबीनवर प्रादुर्भाव होणाऱ्या कीटकांचा हे नाश करू शकते असा कंपनीचा दावा आहे. वेलेक्टिन हे मेड इन इंडिया उत्पादन आहे.
पारिजात इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उदय राज आनंद म्हणाले, की आम्ही पारिजात इंडस्ट्रीजमध्ये भारतीय शेतीसमोरील आव्हानांना सक्रियपणे प्रतिसाद देण्यासाठी वचनबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या गरजांना गतीशील प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणारी एक समर्पित संशोधन आणि विकास करणारी ही टीम आहे.
आयसीएआरकडून सरकारला संशोधन आणि विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेता येईल आणि पिकांवर नवीन कीटकांचा प्रभाव कमी होईल. हवामान बदलामुळे नवीन आव्हाने उभी राहत आहेत. नवीन कीटकांच्या उदयामुळे पिकांचे लक्षणीय नुकसान होत आहे. परिणामी अन्न सुरक्षा धोक्यात येत आहे.
(स्रोत ः agropages.com)