एटीएम न्यूज नेटवर्क : ग्रोमॅक्स ऍग्री इक्विपमेंट ली. ह्या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीद्वारे फळबागा, छोटे शेतकरी ह्यांची गरज लक्षात घेऊन ट्रॅकस्टार ५२५ - ऑर्चर्ड मास्टर हे नवीन ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाल्याची माहिती ग्रोमॅक्सचे स्टेट हेड श्री कैलास तासकर यांनी दिली
ते पुढे म्हणाले कि ग्रोमॅक्स ऍग्री इक्विपमेंट ली. कंपनी ७० वर्षाहून अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. हा महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड आणि गुजरात सरकारचा संयुक्त उपक्रम असून हिंदुस्थान आणि ट्रॅकस्टार अशी दोन ब्रॅण्डस आहेत. ह्या अंतर्गत १५ एच.पी. ते ५० एच.पी.पर्यंत ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. तसेच ट्रॅकमेट या ब्रँडच्या अंतर्गत कंपनी अत्याधुनिक कृषी अवजारांचीही निर्मिती करत असून यात रोटाव्हेटर, मल्टि क्रॉप थ्रेशर, बेलर, नांगर, रोटरी टिलर, स्ट्रा रीपर, ट्रेलर, सिड ड्रिल इ.अवजारांची निर्मिती करते.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची गरज लक्षात घेऊन ग्रोमॅक्स कंपनीद्वारे ट्रॅकस्टार ५२५ - ऑर्चर्ड मास्टर हे २४ एचपी चे छोटे ट्रॅक्टर बनविण्यात आले आहे - ह्यातील मुख्य वैशिष्ट्यांपैकी स्प्रे मॅक्स मोड टेक्नॉलॉजी (पेटंटप्राप्त तंत्रज्ञान) आहे ज्यामुळे औषधी फवारणी यंत्र अधिक क्षमतेने कार्य करते. इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत ह्यात अधिकतम ताकद पीटीओला मिळते, इंजिन टॉर्क देखील अधिकतम असून इंधन देखील कमी लागते. सोबतच ५ वर्ष वारंटी देणारे हे एकमात्र ट्रॅक्टर आहे. तसेच पैशाचा पुरेपूर मोबदला देणारे हे ट्रॅक्टर आहे. जे इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध आहे. विक्री पश्चात सेवे अंतर्गत स्पेअर पार्टस सहज उपलब्धत आहेत. तसेच विविध बँक्स कडून आकर्षक व्याजदरावर अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनविण्यात आले असल्याने हे ट्रॅक्टर नक्की पसंतीस पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कृषीक्षेत्रात कार्य करणाऱ्या उद्योजकांसाठी ग्रोमॅक्सच्या रूपाने नवीन व्यवसायाची संधी निर्माण झाली असून महाराष्ट्रात डीलर नेमणूक सुरू झाली आहे. ह्या डीलर्स च्या माध्यमातून ग्रोमॅक्सच्या ट्रॅक्टर विक्री सोबतच मल्टि ब्रँड वर्कशॉप संकल्पना मांडण्यात आली आहे ज्यामुळे शेतकरी बांधवाना चांगली सेवा मिळेल आणि उद्योजकांना विक्रीपश्चात सेवेतून नियमित व्यवसाय मिळत राहील. इच्छुकांनी ८३०८८२३५३० या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.