एटीएम न्यूज नेटवर्क : कीड तसेच रोगाचा अचूक अंदाज देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ऐतिहासिक हवामान डेटा आणि रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईटचा डेटा वापरणारे किड अंदाज प्लॅटफॉर्म ४ जुलै २०२४ रोजी हैदराबादमधील ॲग्रीटेक फर्म ग्रोरो टेक्नॉलॉजीजने लॉन्च केला.
यामुळे शेतकऱ्यांना कृषी रसायनांचा विवेकपूर्ण व यथोचीत वापर करण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांचे पैसे वाचतील तसेच पर्यावरणातील रसायनांचा कमीत कमी वापर होईल. असे कंपनीने म्हटले आहे. प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त कंपनीने त्यांच्या इको बूस्टर ब्रँडअंतर्गत उत्पादनांच्या नवीन श्रेणीचे अनावरणही केले आहे आणि शेतात पाणी वाचवण्यासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
हे उपाय शाश्वत शेती पद्धतींमध्ये लक्षणीय प्रगती दर्शवतात आणि भारतीय कृषी उद्योगात क्रांती घडवून आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे असे सीईओ नवदीप मेहता यांनी एका प्रकाशनात सांगितले आहे.
जलसंधारण उपायाबाबत व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दासारी म्हणाले की, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ५०% पाण्याची गरज कमी होण्यास मदत होते आणि हे भारतातील पहिला आणि महत्वाचा उपक्रम आहे. स्ट्रॅटेजिक मार्केटिंग मॅनेजर- भारत तरुण पंता म्हणाले की, इको बूस्टर ब्रँड अंतर्गत चार नवीन उत्पादने लाँच करण्यात आली आहेत.
संस्थापक आणि संचालक श्रीकांत पीजे म्हणाले की, कंपनी नाविन्यपूर्ण, परवडणारी आणि शाश्वत उत्पादनाचे समाधान प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे ज्यामुळे शेतीमध्ये परिवर्तन होईल. यात १६० हून अधिक पीक संरक्षण रसायनांची नोंदणी झाली आहे.