नियमित अपडेट

सदस्यता

ग्रुपमध्ये सामील व्हा
  • सदस्यता
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • होम
  • ज्ञान
  • संशोधन
  • ब्लॉग
  • व्यवसाय संधी
  • नोकरी संधी
  • संपर्क करा
  • सदस्यता

महाराष्ट्रात ग्रोमॅक्स वाढवणार आपले डीलर नेटवर्क; कृषी उद्योजकांना संधी

एटीएम न्यूज (नाशिक): कृषी यंत्रसामग्री क्षेत्रातील विश्वासार्ह आणि वेगाने वाढणारा ब्रँड ग्रोमॅक्स ऍग्री इक्विपमेंट लिमिटेड (Gromax Agri Equipment Limited) महाराष्ट्रात आपले डीलर नेटवर्क विस्तारण्यावर भर देत आहे. मजबूत उत्पादने, शाश्वत व्यवसाय मॉडेल, सर्वसमावेशक व्यावसायिक सहाय्य आणि आकर्षक गुंतवणूक परतावा (ROI) यांच्या बळावर कंपनी तरुण उद्योजकांना कृषी व्यवसाय क्षेत्रात यशस्वी करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

महिंद्राचा वारसा आणि मजबूत पाठबळ
महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra)
यांचा विश्वासार्ह वारसा आणि गुजरात सरकारचे सहकार्य यामुळे ग्रोमॅक्सला स्थिरता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन व्यवसाय वृद्धीसाठी मजबूत पाया लाभला आहे. त्यामुळे डीलर्सना नामांकित ब्रँडसोबत व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वास मिळतो.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी व्यापक उत्पादन श्रेणी
ग्रोमॅक्सकडे (Gromax) ऑर्चर्ड, नॅरो-ट्रॅक तसेच उच्च क्षमतेच्या व्यावसायिक ट्रॅक्टरची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या (Indian Farmers) विविध गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेली ही उत्पादने आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक वैशिष्ट्ये आणि विविध पर्यायांसह बाजारात उपलब्ध आहेत.

एकाच ठिकाणी सर्वसमावेशक व्यवसाय सहाय्य
ग्रोमॅक्स (Gromax) आपल्या डीलर्सना (Dealers) ट्रॅकमेट इम्प्लिमेंट्स (Trakmate Implements), अस्सल स्पेअर पार्ट्स, ल्युब्रिकंट्स व ऑइल्स, मल्टी-ब्रँड वर्कशॉप सुविधा, व्यावसायिक सेवा सहाय्य आणि कॅप्टिव्ह फायनान्सिंग सोल्यूशन्स (Captive Financing Solutions) अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देते. महिंद्रा ट्रॅक्टरसोबत (Mahindra Tractor) सुमारे ७० टक्के घटक समान असल्यामुळे स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होतात आणि देखभाल खर्चही कमी राहतो.

आकर्षक वित्तीय सुविधा आणि मार्केटिंग सहाय्य
ग्राहकांसाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडे बँका व कर्ज संस्थांचे मजबूत आहे. यामुळे डीलर्सना विक्री वाढविण्यास मदत होते. तसेच उत्पादन प्रचार आणि विपणन उपक्रमांसाठी कंपनीकडून ५० टक्क्यांपर्यंत सहाय्य दिले जाते, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ब्रँडची ओळख अधिक प्रभावीपणे निर्माण करता येते.

नव्या उद्योजकांसाठी मोठी संधी
महाराष्ट्रात विस्तार करत असताना ग्रोमॅक्स (Gromax) नव्या डीलर्सना स्वतःची बाजारपेठ विकसित करण्याची, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची आणि कृषी यंत्रसामग्री क्षेत्रात दीर्घकालीन व फायदेशीर व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. प्रत्येक डीलरला कंपनीच्या प्रशिक्षित आणि समर्पित व्यवस्थापकांचे मार्गदर्शन मिळत असल्याने व्यवसाय वृद्धीचा मार्ग अधिक सुलभ होतो.

“Grow More with Gromax” या ध्येयवाक्यासह कंपनी कृषी (Agri) विकासाबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजकतेलाही चालना देत असून, कृषी क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधींसाठी ग्रोमॅक्स एक आशादायी पर्याय म्हणून पुढे येत आहे.

अशी माहिती देतांना कंपनीचे अधिकारी कैलास तासकर यांनी अधिक माहितीसाठी ८३०८८२३५३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

  • Jun 05, 2026
  • शेती


इतर बातम्या
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती

Share:

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp

Agri Trade Media(ATM) कृषी व्यापार आणि उद्योगांसाठी फायदेशीर सामग्री प्रकाशित करते जे जमिनीत कष्ट करणाऱ्या आणि गाळणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतात. आम्ही निर्माते आणि उत्पादक, डीलर्स आणि अर्थातच शेतकरी यांच्यातील पूल म्हणून काम करतो. शेतीवर दबाव वाढत आहे. हे प्रश्न शेतकरी, कृषी उद्योग आणि धोरणकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालत आहे.

वृत्तपत्र

कृपया आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

Useful Links

  • संशोधन
  • ज्ञान
  • शासन
  • जॉब ऑफर
  • सदस्यता
  • माहिती

Copyright © All rights reserved | Agro Trade Media

  • Terms of use
  • Privacy Policy
  • Contact