एटीएम न्यूज नेटवर्क ः बेस्ट अॅग्रोलाइफ लिमिटेड या भारतीय कृषी रसायन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीला केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीद्वारे तणनाशक प्रोपॅक्विझाफॉपच्या स्वदेशी उत्पादन करण्यासाठीची नोंदणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट अॅग्रोलाइफ लिमिटेड ही प्रोपॅक्विझाफॉप टेक्निकलचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कृषी रसायन कंपनी ठरली आहे.
प्रोपॅक्विझाफॉप हे तणनाशक आहे. ते सोयाबीन, कापूस, कडधान्ये, सूर्यफूल, इतर शेतातील पिके, भाजीपाला, फळझाडे, द्राक्ष, ऊस, तेलबिया यांसारख्या विस्तृत पानांच्या पिकांमध्ये वार्षिक आणि बारमाही गवतांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. ते तणांना त्यांच्या विकासाच्या सर्व टप्प्यांवर नियंत्रित करते. पर्यावरणास अनुकूल आणि फायदेशीर कीटक आणि सस्तन प्राण्यांसाठी सुरक्षित प्रोपॅक्विझाफॉप पानांद्वारे त्वरीत शोषले जाते.
बीएएलने या वर्षी नावीन्याचा आणि प्रगतीचा झंजावात कायम राखला असून, हे सर्व संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्ही साध्य करू शकलो आहोत. प्रोपॅक्विझाफॉपशिवाय टेक्निकल, एक्समन, रोन्फेन, रिव्हल टॉम्बो आणि वॉर्डन बीएएल ही पाच नवी उत्पादने बीएएलने तयार केलीच आहे. शिवाय सिटीजन आणि व्हिस्तारा लाँच करून औषधोत्पादनात स्वदेशी औषधे तयार करणारी बीएएल ही पहिली भारतीय ऍग्रोकेमिकल कंपनी ठरली आहे. सायझोफामिड, डायमेथोमॉर्फ आणि डायफेनोकोनाझोलच्या पहिल्या प्रकारच्या बुरशीनाशक रचनेचे पेटंटदेखील कंपनीला मिळाले, अशी माहिती बीएएलचे व्यवस्थापकीय संचालक विमल अलावधी यांनी दिली.
बीएएल ही संशोधन आधारित संस्था नवीन कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनच्या स्वरूपात जागतिक दर्जाची आणि किफायतशीर शेती उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची सेवा करत आहे. सध्या बीएलकडे गजरौला, ग्रेटर नोएडा आणि जम्मू आणि काश्मीरमधील तीन उत्पादन प्रकल्पांद्वारे अनुक्रमे 7,000 एमटीपीए आणि 30,000 एमटीपीए तांत्रिक आणि फॉर्म्युलेशन उत्पादन क्षमता आहे. बीएएलचे भारतात 5200 पेक्षा जास्त वितरक असून, 360+ फॉर्म्युलेशन आणि 80 पेक्षा जास्त तांत्रिक उत्पादन परवाने यांचा अतुलनीय पोर्टफोलिओ राखून ठेवला आहे. कंपनी अलीकडेच बीएसईवरील कंपन्यांच्या बी गटातून ए गटात गेली आहे.