एटीएम न्यूज नेटवर्क : अग्रगण्य कृषी रसायन कंपनी धानुका ॲग्रीटेक लिमिटेडने शक्तिशाली कीटकनाशक 'लानेव्हो' (बायफेन्थ्रिन ५.८१ %+ फ्लक्सामेटामाइड ५.८१% ईसी), आणि जैव-खते 'माय कोअर सुपर' या दोन अभूतपूर्व उत्पादनांचे अनावरण केले. हे उत्पादन पीक संरक्षण आणि पीक उत्पादनांमध्ये क्रांती आणण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
'लानेव्हो' ने निसान केमिकल कॉर्पोरेशन, जपानसोबत धोरणात्मक सहकार्य केले आहे, ज्यामुळे धानुकाचा कीटकनाशक पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे. लानेव्हो शोषक कीटकांपासून पीक संरक्षण देते व पीक उत्पादन वाढवते अशाप्रकारे त्याचे अद्वितीय पद्धतीसह दुहेरी फायदे आहेत.
धानुका ऍग्रीटेक लिमिटेडमधील अलायन्सेस आणि सप्लाय चेनचे कार्यकारी संचालक श्री हर्ष धानुका यांनी निसान केमिकल्स कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, किरकोळ विक्रेते, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रमुख डीलर्सच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले आणि नवीन उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि फायद्यांची रूपरेषा सांगितली. श्री. धानुका पुढे म्हणाले की, 'लानेव्हो' कीटकनाशक शेतकऱ्यांना, विशेषतः भाजीपाला पिकवणाऱ्या, शोषक आणि चघळणाऱ्या कीटकांवर चांगले नियंत्रण मिळवण्यास मदत करते. 'लानेव्हो' ' हे एक शक्तिशाली, व्यापक- स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे. जे जॅसिड, थ्रिप्स, व्हाईट फ्लाय, शूट आणि फ्रूट बोरर, लीफ मायनर यासह विविध प्रकारच्या कीटकांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते. हे उत्पादन कीटकनाशक कायदा, १९६८ च्या कलम ९(३) अन्वये धानुकाद्वारे सादर केले गेले,
निसान केमिकल जपानचे जनरल मॅनेजर आणि आंतरराष्ट्रीय विक्री प्रमुख वाय फुकागावा सॅन म्हणाले की, कीटक प्रतिरोधक विकासासाठी ‘लानेवो’चा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि हे कीटकनाशक पानांच्या खालच्या पृष्ठभागावर लपणाऱ्या कीटकांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते. हे शक्तिशाली कीटकनाशक लागू करणे सोपे असून यापासून आपण निरोगी पिके आणि उच्च उत्पादन मिळवू शकत असल्याचे सॅन यांनी सांगितले.
निसान ॲग्रो टेक इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.आर.के. यादव म्हणाले की 'शेतकरी त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी लानेव्होच्या दुहेरी शक्ती, विश्वासार्हता आणि जलद कृतीवर विश्वास ठेवू शकतात'. उत्कृष्ट परिणामांसाठी आपल्या मिरची, टोमॅटो, वांगी पिकांमध्ये कीटक दिसायला लागल्यावर लानेव्होचा वापर करावा असा त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना सल्ला दिला.
'मायकोअर सुपर' या जैवखताची ओळख करून देताना धानुका ॲग्रीटेकचे राष्ट्रीय विपणन प्रमुख श्री मनोज वार्ष्णेय यांनी उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी उच्च मूल्य असलेल्या पिकांमध्ये या जैव खताची उ[पयोगिता अधोरेखित केली. या नैसर्गिक जैविक प्रक्रियेच्या सामर्थ्याचा उपयोग करून शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतात असे श्री. वार्ष्णेय पुढे म्हणाले. धानुका ॲग्रीटेक कृषीक्षेत्रात नावीन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी वचनबद्ध आहे.