एटीएम न्यूज नेटवर्क : पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर करत अश्रुधुराचा मारा केला. यावेळी हवेत मोठ्या प्रमाणावर धुर पसरल्याने आंदोलकांची पळापळ झाली. या मार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डर वरील मोठ मोठे क्रांक्रीट ब्लॉग हटवून दुर फेकत राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे,आंदोलक शेतकऱ्यांची पिकांना किमान हमी भाव देणारा कायदा करण्याची मागणी आहे. सरकारबरोबर बोलणी फिस्कटल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे.
शेतीमालासाठी एमएसपीचा कायदा बनवण्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आंदोलक शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ चा नारा देत दिल्लीकडे कुच करण्यासाठी घर- दार सोडून निघाले आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रवाशांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष सूचना केल्या आहेत. वाहतुकीला अनेक ठिकाणी निर्बंध लावल्याने दिल्ली-एनसीआर मध्ये लोकांना वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक मार्गांवर संत गतीने वाहतूक सुरू आहे.
शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून कायदा करावा,शेतीमाल आयात निर्यात धोरणाबाबतीत कायद्याची अंमलबजावणी करावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा यासह अनेक शेती संबंधातील मागण्या घेऊन शेतकरी मंगळवारी पंजाब-हरियाणा येथून राष्ट्रीय राजधानी दिल्लीकडे मोर्चाने दिल्लीकडे निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस प्रशासनाने दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व सीमा सिल केल्या आहेत. अनेक रस्त्यांवरची वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतूकीच्या निर्बंधामुळे दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, गुरूग्राम, फरीदाबादसह एनसीआरच्या शहरांमधील लोकांना ट्रॅफिक जामच्या समस्येचा सामना करावा लागला आहे.