एटीएम न्यूज नेटवर्क : इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) आणि बायर कंपनी तर्फे कृषीविकासाचे क्षमता असलेले जागतिक उपक्रम, आधुनिक कृषी तंत्राचा अवलंब करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांद्वारे शेतकऱ्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी नुकतीच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या भागीदारीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना कृषीविषयक उपाय, पीक संरक्षण, थेट बियाणे, यांत्रिकीकरण आणि जल, सकारात्मक पद्धतींसाठी अचूक साधने प्रदान करून त्यांचे जीवनमान सुधारणे हे आहे. शेतकऱ्यांना शाश्वत शेती आणि यांत्रिकीकरण उपायांसाठी सहाय्य प्रदान करून शेतीच्या शाश्वत पद्धतींबद्दल ज्ञान आणि जागरूकता वाढवणे आहे.
शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये सामील होण्यास सक्षम करून अधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे. पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावू शकतात. यासाठी कर्नालच्या आयसीएआर-केव्हीके द्वारे नुकतीच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कृषी विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. यू.एस. गौतम, आयसीएआरच्या कृषी विस्तार विभागाचे संचालक डॉ. धीरसिंग,यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. गौतम यांनी हा आयसीएआर-बायर सहयोग एक अनोखा सार्वजनिक-खाजगी-शेतकरी-सहभाग (पी-पी-पी-पी) उपक्रम आहे. जो शेतकऱ्यांना सर्वात उत्पादक वाण आणि तंत्रज्ञानाची निवड करण्यास अनुमती देत असून भविष्यासाठी शाश्वत अन्न उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी मोठी मदत होईल.
या कार्यशाळेला आयसीएआरचे संचालक डॉ. धीरसिंग, आयसीएआरचे कृषी विस्तार विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर. आर. बर्मन, आयसीएआरचे झोन-२ चे संचालक,डॉ. जे. पी. मिश्रा, संचालक डॉ. परवेंदर शेओरन, बायरच्या लीड गव्हर्नमेंट अफेयर्सचे डॉ. संगीता डावर, बायरचे राईस प्लॅटफॉर्म लीड डॉ.अजित चहल, बायरचे दक्षिण आशिया अध्यक्ष सायमन वाईबश या कार्यशाळेत उपस्थित होते.
खरीप-२०२४ मध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या ८ राज्यांमध्ये पसरलेल्या ४६ कृषी विज्ञान केंद्रा मध्ये प्रात्यक्षिके आयोजित केली जातील.