एटीएम न्यूज नेटवर्क ः तणांमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आसीएआर)ने नुझिवीडू सीड्स लिमिटेड कंपनीला ‘HT ट्रेट डोनर राइस जीनोटाइप तंत्रज्ञान’ चे हस्तांतरण केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण योगदान देईल,असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी ‘HT ट्रेट डोनर राइस जीनोटाइप तंत्रज्ञान’ विकसित केले आहे. कराराचे हस्तांतरण अॅग्रीनोव्हेट इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात आले.
आयसीएआर- आयएआरआयचे संचालक ए.के. सिंग यांनी इथाइल मिथेन सल्फोनेट प्रेरित तणनाशक वापरून, इमाझेथापीर 10 टक्के SL असलेल्या गैर जीएम तणनाशक जीनोटाइपच्या विकासाविषयी माहिती दिली.
अॅग्रीनोव्हेट इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण मलिक, आयसीएआर-आयएआरआयचे सहाय्यक संचालक विश्वनाथन चिन्नुसामी आणि व्यावसायिक कंपन्यांचे प्रतिनिधी, संबंधित कंपन्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.