एटीएम न्यूज नेटवर्क : नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनची (नाडा) २१ सप्टेंबर रोजी रासायनिक खतांची लिंकिंगसह खरेदी या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात कुठेही रासायानिक खते लिकिंग मटेरियलसह खरेदी करू नये म्हणजेच खते लिकिंगसह खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या पार्श्वभूमीवर नुकतीच अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या कार्यालयात श्री. आमले साहेब, अधिक्षक कृषी अधिकारी, श्री. संजय शेवाळे साहेब, कृषी विकास अधिकारी, श्री. जमदाडे साहेब मोहिम अधिकारी, श्री. सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीत रासायनिक खते विक्रेते कंपनी प्रतिनिधी व नाडा पदाधिकारी तसेच तालुका अध्यक्ष यांची संयुक्त बैठक झाली.
सदर बैठकीमध्ये सर्व रासायनिक खत विक्रेते कंपन्यांनी कुठल्याही रासायनिक खतांबरोबर लिकिंग करणार नाही अशी ग्वाही दिली. आपला हा रासायनिक खते लिकिंग संबंधातील लढा यशस्वी झाला असल्याचे नाडा संस्थेने कळविले आहे. विक्रेत्यांनी यापुढे रासायनिक खते विकत घेतांना लिकिंग न घेता ऑर्डर द्यावी. आपण रासायनिक खते लिकिंगसह खरेदी बंद करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे नाशिक ऍग्रो डीलर्स असोसिएशनने कळविले आहे.
नाशिक ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व शासकीय अधिकारी, कंपनी प्रतिनिधी व ऍग्रो डिलर बंधुचे आभार मानण्यात आले असून सर्वानी एकजूट दाखवल्यामुळे आपण हा लढा यशस्वी करू शकलो असल्याचे नाडाचे अध्यक्ष यांनी सांगितले.