एटीएम न्यूज नेटवर्क : गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस, कमी जलसाठ्याची पातळी आणि निर्यातीवरील निर्बंध यामुळे रब्बी कांद्याची पेरणी १० ते १५ टक्क्यांनी घसरली आहे. कांदा लागवड हंगाम संपायला अजून काही दिवस बाकी आहेत. या हंगामात कांद्याच्या एकरी उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रब्बी म्हणजेच हिवाळी कांद्याची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील काही मुख्य कांदा उत्पादक प्रदेशांमध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. कांदा लागवड संपायला अजून काही दिवस बाकी असताना या हंगामात कांद्याच्या एकरी उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मार्च-एप्रिलच्या आसपास अन्नधान्य महागाई उच्च पातळीवर जाऊ शकते.
क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सचे संचालक पुशन शर्मा म्हणाले की, सध्याच्या कांदा लागवडीच्या पातळीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते, परंतु रब्बी कांदा लागवडीखालील क्षेत्रामध्ये १० टक्के घट होऊन हंगाम संपुष्टात येईल.
देशातील एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के कांदा रब्बी हंगामात होतो. या हंगामात उत्पादित केलेल्या कांद्याची साठवणूक क्षमता सुमारे ५ ते ७ महिने जास्त असते आणि मार्च ते सप्टेंबर या कालावधीत लोकसंख्येला खायला देण्याबरोबरच मागणी व पुरवठ्याची गतिशीलता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी असते.
प्रमुख कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये जलसाठ्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे, विहिरीला मर्यादित पाणी असल्याचा कारणामुळे शेतकऱ्यांनी रब्बी कांद्याचे उत्पादन कमी घेतले आहे.