भारतातील रोटाव्हेटर बाजारात उत्साह; ही आहेत वाढीची कारणे
एटीएम न्यूज नेटवर्क भारतीय कृषी उपकरणांच्या बाजारपेठेत लक्षणीय आणि हळूहळू वाढ
दिसून येत आहे. नवीन संशोधन अहवालानुसार, २०२२-२०२७ दरम्यान भारतीय कृषी उपकरणे
बाजारात १०.६ टक्के सीएजीआरने वाढण्याची शक्यता आहे.
विशेषतः रोटाव्हेटर बाजारात भारतात १० टक्के वाढ अपेक्षित आहे. कृषी यंत्रांच्या बाजारपेठेतील
रोटाव्हेटरचा एकूण बाजार हिस्सा सुमारे ९,२६० कोटी रुपये आहे. यंत्रसामग्री व्यवसायाच्या एकूण
बाजारातील हिस्सा सुमारे ८ ते १० टक्के आहे.
२०२१ आणि २०२६ दरम्यान जागतिक रोटाव्हेटर बाजाराचा आकार ३४९.८३ दशलक्ष अमेरिकी
डॉलर वाढण्याची शक्यता आहे. जो अंदाज कालावधीत ३.८८% च्या सीएजीआरने वाढेल.
स्पर्धात्मक परिस्थिती, व्यवसायांवर महामारीपूर्वीचा आणि नंतरचा प्रभाव, नवीन उत्पादनांचे
अनावरण आणि इतर घटक विचारात घेऊन तज्ज्ञांनी आगामी वर्षांमध्ये उच्च वाढ
सुचविली आहे.
जागतिक रोटाव्हेटर्स मार्केटचे मूल्य २०२१ मध्ये १.६ बिलियन अमेरिकी डॉलरवरून आर्थिक वर्ष
२०२२ मध्ये १.७ बिलियन अमेरिकी डॉलर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात उद्योगाने वर्ष-
दर-वर्ष ३.४% ची वाढ नोंदवली आहे. २०२२ ते २०३२ पर्यंत रोटाव्हेटर विक्री ३.४ टक्के
सीएजीआरवर वाढून २०३२ च्या अखेरीस २.४ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल.
भारतातील कृषी रोटाव्हेटर्सच्या विक्रीतून मिळणारा महसूल सुमारे ९२०० कोटी रुपये आहे. तो
दरवर्षी वाढत आहे. अलिकडच्या वर्षांत रोटाव्हेटर्सची लोकप्रियता वाढली आहे. कारण शेतकरी इतर
मशागत अवजारांच्या तुलनेत रोटाव्हेटर वापरण्याच्या फायद्यांबद्दल अधिक जागरूक झाले
आहेत. ते विशिष्ट मातीच्या गरजेनुसार समायोजित केले जाऊ शकतात. देशातील कृषी
रोटाव्हेटरच्या एकूण विक्रीत सातत्याने वाढ होत आहे.
जागतिक पातळीवर रोटाव्हेटर मार्केट ३.८८ टक्के सीएजीआरसह वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये
२०२६ पर्यंत आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा वाटा सुमारे ५४ टक्के असेल. २०२२-२३ या वर्षांसाठी ३.२८
टक्के दराने वाढ अपेक्षित आहे.