एटीएम न्यूज नेटवर्क : भारतीय समूह दीपक फर्टिलायझर्स सोबत सहयोगी करारावर स्वाक्षरी करून हैफा समूह भारतात आपल्या कार्याचा विस्तार करत आहे. दीपक फर्टिलायझर्स ही भारतातील सार्वजनिक कंपनी असून ही कंपनी महाधन एग्रोटेक लिमिटेडची (MAL) मूळ कंपनी आहे. जी अद्वितीय खत निर्मितीमध्ये प्रसिद्ध आहे. हैफा ग्रुप आणि दीपक येत्या काही वर्षांमध्ये भारतातील वनस्पती पोषण आणि कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण लक्षणीय सुधारणा करण्यासाठी सहकार्य करतील.
या नवीन धोरणात्मक सहकार्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रगत वनस्पती पोषण उपाय आणि प्रभावी पोषण पद्धती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. तसेच संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. भारतीय शेतकऱ्यांसाठी आधुनिक उपायांच्या सुलभतेवर भर देऊन अचूक वनस्पती पोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या कंपन्या एकत्रितपणे काम करतील.
दीपक फर्टिलायझर्स ही भारतातील एक मोठी सार्वजनिक कंपनी असून भारतामध्ये अमोनिया आणि मोठ्या प्रमाणात खते तसेच विशेष खतांच्या उत्पादनात अग्रणी आहे. कंपनीचा भारतीय उपखंडात महत्त्वाचा प्रभाव आहे आणि शेकडो सक्रिय वितरक आणि डीलर्सच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत या कंपनीची उत्पादने विकली जातात.
हैफा ग्रुपचे सीईओ मोट्टी लेव्हिन :
हैफा ग्रुपचे सीईओ मोट्टी लेव्हिन यांनी या प्रसंगी सांगितले कि, "मला आनंद आहे की आम्ही महाधन एग्रोटेक लिमिटेड सोबत हा करार केला आहे, ज्याचा उद्देश भारतातील कृषी क्षेत्राला पाठिंबा देणे आहे. आमचे कौशल्य आणि संसाधने महाधन एग्रोटेक लिमिटेडच्या सहकार्याने स्थानिक भारतातील शेतकऱ्यांच्या विकसित होत असलेल्या गरजांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना देईल. या सहयोगाद्वारे आम्ही भारतीय शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लेव्हिन यांनी सांगितले.
हैफा ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट नॅटन फेल्डमन :
हैफा ग्रुप बिझनेस डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशनचे व्हाईस प्रेसिडेंट नॅटन फेल्डमन हे म्हणाले कि, आम्हाला हा सहयोगी करार सादर करताना अभिमान वाटतो, जिथे दोन्ही कंपन्या भारतीय शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केलेल्या शाश्वत शेतीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न, पीक पोषण सुरक्षा सुधारण्यासाठी काम करतील.
महाधन एग्रोटेक लिमिटेड (MAL) बद्दल :
महाधन एग्रोटेक लिमिटेड (MAL) पूर्वी स्मार्टकेम टेकनॉलॉजिस लिमिटेड (STL) म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, जी औद्योगिक रसायने आणि खतांची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. अमोनियम नायट्रेट (खाण रसायने), औद्योगिक क्लीनर आणि पीक पोषण (खते) ही कंपनी उत्पादित करते. कंपनी पायाभूत सुविधा, खाणकाम, रसायने, फार्मास्युटिकल्स आणि कृषी यासारख्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण क्षेत्रात कार्यरत आहे. डीएफपीसीएल हा एक वैविध्यपूर्ण भारतीय समूह असून सार्वजनिकरित्या नोंदणीकृत आहे आणि महाराष्ट्र (तलोजा), गुजरात (दहेज), आंध्र प्रदेश (श्रीकाकुलम) आणि हरियाणा (पानिपत). या चार राज्यांमध्ये कारखाने चालवते