एटीएम न्यूज नेटवर्क : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तुरीचा फुले पल्लवी (१२-१९-२) आणि वालाचा फुले श्रावणी (पीडब्लूबी १७-१८) असे हे दोन वाण कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केले आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन वाण विकसित केले आहेत.
तुरीचा फुले पल्लवी वाणाची वैशिष्ट्ये :
वालाचा फुले श्रावणी वाणाची वैशिष्ट्ये :
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य प्रकल्पाचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ.एन.एस.कुटे, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ.व्ही.एम.कुलकर्णी, वरिष्ठ संशोधन सहायक वाय. आर. पवार, तूर रोग शास्रज्ञ डॉ.व्ही.ए.चव्हाण, तूर कीटक शास्रज्ञ डॉ. सी. बी. वायळ आणि कृषी सहायक वसंत भोजने यांचे फुले पल्लवी वाण विकसित करण्यात महत्वपूर्ण योगदान आहे.
फुले श्रावणी वालाचा वाण विकसित करण्यामध्ये संशोधन प्रकल्पातील पीक पैदासकार डॉ. एम. टी. भिंगारदे, प्रमुख शाश्रज्ञ डॉ. सुरेश दोडके, सहायक प्राध्यापक डॉ. वाय. जी. बन, कृषी सहायक बी. आर. अडसुरे आणि श्री. एस.एस. वेताळ यांचे योगदान आहे.