एटीएम न्यूज नेटवर्क: जगभरातील उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, खेळ अशा सर्वच क्षेत्रात भारतीय नागरिकांचा डंका आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भारतीय किंवा भारतीय वंशाचे नागरिक उच्चपदावर कार्यरत आहेत. असाच एक बहुमान भारतीय विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रात मिळाला आहे. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स म्हणजेच अर्धशुष्क उष्ण कटिबंध आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेच्या अमेरिकेतील अटलांटा येथे झालेल्या विज्ञान आणि अभियांत्रिकी मेळाव्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने भारताचे प्रतिनिधित्व केलेच, शिवाय 1000 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 83 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्समधील 17 वर्षीय संशोधक प्रशिक्षणार्थी सर्वेश प्रभू याने अटलांटा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी मेळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये सर्वेशला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. बैलाच्या हृदयाच्या (अॅनोना रेटिक्युलाटा) पाने ज्याला रामफळ असे म्हणतात. त्यापासून त्याने किफायतशीर जैवकीटकनाशक विकसित केले आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने सर्वेश प्रभूला उत्कृष्ट संशोधनाबद्दल एक लाख रुपयांच्या पारितोषिकाने गौरविले आहे. सर्वेश सध्या हैदराबादच्या एफआयआयटीजेईई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सर्वेशने संस्थेच्या भारतातील मुख्यालयात कीटकशास्त्र विभागात संशोधन प्रयोग केले.अमेरिकेतील अटलांटा येथे भरलेल्या जगातील सर्वात मोठ्या महाविद्यालयीन विज्ञान मेळाव्यात या संशोधनातील निरीक्षण सादर करण्यात आले.
संस्थेचे संशोधन विभागाचे उपमहासंचालक डॉ. अरविंद कुमार म्हणाले की, संस्था तरुणांना कृषी संशोधनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. संस्थेने स्थापनेपासून 7000 हून अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्वानांना संशोधनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा देत बहुविद्याशाखीय मार्गदर्शन केले आहे.
‘अनोना रेटिक्युलाटाच्या जैवकीटकनाशक गुणधर्मांचा नवीन अभ्यास’ नावाच्या प्रकल्पात जैवकीटकनाशकाचे गुणधर्म प्रदर्शित झाले. पारंपरिकपणे या वनस्पतीच्या विविध भागांच्या अर्कांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. बैलाच्या हृदयाच्या पानांचे अर्क तीन विनाशकारी कीटकांवर परिणामकारक करू शकतात असे अभ्यासातून असे दिसून आले आहे.
रासायनिक कीटकनाशके वापरून फायदेशीर कीटकांचा नाश करून आणि माती, अन्नपदार्थ दूषित करून लागवडीचा खर्च 24-50 प्रति एकर अमेरिकी डॉलर्स इतका वाढतो. दुसरीकडे जैवकीटकनाशकांची किंमत प्रति एकर पीक जमिनीसाठी 9-12 अमेरिकी डॉलरदरम्यान असते. जैवकीटकनाशक पर्यावरणास अनुकूल आणि आरोग्यदायी उत्पादन देतात. बैलांच्या हृदयाच्या पानांपासून कीटकनाशक तयार करण्यासाठी 0.33 प्रति लिटर अमेरिकी डॉलर इतका खर्च येतो. यामुळे ते अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी परवडणारे कीटकनाशक बनते. तसेच मानवी वापरासाठी फळे आणि जैवकीटकनाशकांच्या अर्कांसाठी पानांच्या विक्रीद्वारे उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण होतो.