नाशिक : आजची युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतातील अग्रगण्य ‘कृषीथॉन’ या प्रदर्शनाच्या व्यासपीठावरून विविध श्रेणीत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये 'प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार', 'प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार', 'प्रयोगशील कृषीविस्तार कार्य', 'प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (पुरुष व महिला गट) अशा चार गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातात यापैकी प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष संजय न्याहारकर यांनी दिली.
प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारात डॉ.माधवी प्रकाश सोनेने (नाशिक), डॉ. रोशन मारोती शिंदे (वाशीम), डॉ. सायली विजय साळुंखे (नाशिक), डॉ. विशाखा काशिनाथ बागुल (सटाणा), डॉ. सोज्वळ शालिकराम शिंदे (वाघोली), डॉ. शोभा देविदास सुरभैय्या (अहिल्यानगर), श्री. रामचंद्र जालिंदर नवत्रे (सातारा), श्री. शिवम सत्यवान मद्रेवार (सांगली), डॉ. सोनम अरुण मेहत्रे (कोल्हापूर), डॉ. प्रियांका राजकुमार खोले (नांदेड), श्री.अथर्व राजेंद्र कुलकर्णी (पुणे) यांची निवड झालेली आहे.
प्रयोगशील युवा कृषी यांत्रिकीकरण संशोधन नवउद्योजक श्रेणीत श्री. तिरुपतीबालाजी शांताराम दिघोळे (सिन्नर), श्री.अविष्कार संजय अनार्थे (नाशिक) यांची निवड झाली असून प्रयोगशील कृषी यांत्रिकीकरण संशोधक शेतकरी पुरस्कारासाठी श्री. गणू दादा चौधरी (धुळे) यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या पुरस्कारार्थींना हे पुरस्कार नाशिकच्या ठक्कर्स मैदान येथे २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या कृषीथॉन प्रदर्शनाच्या सतराव्या आवृत्तीमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.