नियमित अपडेट

सदस्यता

ग्रुपमध्ये सामील व्हा
  • सदस्यता
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • होम
  • ज्ञान
  • संशोधन
  • ब्लॉग
  • व्यवसाय संधी
  • नोकरी संधी
  • संपर्क करा
  • सदस्यता

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; जुलै महिन्यापासून रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता

एटीएम न्यूज (नाशिक) : राज्य सरकारने (Maharashtra State Government) जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' नंतर राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये (Farmers) चर्चा होत आहे. ती म्हणजे कर्जमाफीची रक्कम नेमकी खात्यात कधी जमा होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय हालचालींना वेग देण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, बँकांकडून (Bank) कर्ज (Loan) खात्यांचा तपशील घेणे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे या प्रक्रिया सुरू असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज (Crop Loan) माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून नव्याने कर्ज (Loan) घेण्याच्या अडचणी दूर होऊन मार्ग मोकळा होणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान
या योजनेचे (Scheme) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

आता लक्ष अंमलबजावणीकडे 
कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील शेतकरी आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष ठेवून आहेत. पात्रता, लाभार्थी यादी आणि रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून निधी वितरणास सुरुवात झाल्यास लाखो शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.

  • Jun 08, 2026
  • शेती


इतर बातम्या
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती

Share:

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp

Agri Trade Media(ATM) कृषी व्यापार आणि उद्योगांसाठी फायदेशीर सामग्री प्रकाशित करते जे जमिनीत कष्ट करणाऱ्या आणि गाळणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतात. आम्ही निर्माते आणि उत्पादक, डीलर्स आणि अर्थातच शेतकरी यांच्यातील पूल म्हणून काम करतो. शेतीवर दबाव वाढत आहे. हे प्रश्न शेतकरी, कृषी उद्योग आणि धोरणकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालत आहे.

वृत्तपत्र

कृपया आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

Useful Links

  • संशोधन
  • ज्ञान
  • शासन
  • जॉब ऑफर
  • सदस्यता
  • माहिती

Copyright © All rights reserved | Agro Trade Media

  • Terms of use
  • Privacy Policy
  • Contact