एटीएम न्यूज नेटवर्क : भारतातील अग्रगण्य कृषी कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने दहा नवीन उत्पादने सादर केली आहेत. या उत्पादनाचे उद्दिष्ट पीक उत्पादन वाढवणे, कीटकांचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे आणि देशभरात शाश्वत कृषी पद्धतींना चालना देणे हा आहे. यामध्ये तीन पेटंट उत्पादने, एक नाविन्यपूर्ण नीम कोटेड बायो प्लांट आणि मृदा आरोग्य प्रवर्तक आणि पाच जेनेरिक फॉर्म्युलेशन यांचा समावेश आहे जे भारतीय शेतकऱ्यासाठी उच्च-परिणामकारक सर्वसमावेशक पीक संरक्षण उपाय प्रदान करतात.
कंपनीने आयएसके जपान सोबत भागीदारी करून 'प्रचंड' हे पेटंट उत्पादन लाँच केले आहे. या उत्पादनात प्रगत जपानी तंत्रज्ञानाचा वापर असून भात पिकांचे स्टेम बोअर आणि लीफ फोल्डर यासारख्या विनाशकारी कीटकांपासून संरक्षण करते. यामुळे शेतकऱ्याचे ७० टक्के पर्यंतचे संभाव्य उत्पादन नुकसान कमी होते.
आणखी एक अत्यंत विनाशकारी कीटक जो कॉर्न पिकांचा नाश करतो. दरवर्षी ३० टक्के पर्यंत नुकसान होते. यासाठी फॉल आर्मीवॉर्म ही कॉर्न शेतकऱ्यासाठी या धोक्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी कंपनीने अनोखी फॉर्म्युलेशन विकसित केली आहे. पीक आरोग्य आणि उत्पादन सुधारण्यासाठी दोन नवीन पेटंट बुरशीनाशके लाँच करण्यात आली आहेत जी भातामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या रोगाच्या नियतनासाठी आणि दुसरे नाविन्यपूर्ण बुरशीनाशक द्रावण जे बटाटा, द्राक्षे आणि टोमॅटो पिकांमध्ये सर्वसमावेशक रोग नियंत्रणासाठी आहे. कंपनीने पाच नवीन जेनेरिक देखील लॉन्च केले आहेत, ज्यात ३ तणनाशकांचा समावेश आहे.
डॉ. रघुराम देवरकोंडा (कार्यकारी संचालक, सीपीसी, जैव उत्पादने आणि रिटेल) यांनी या लाँचिंग प्रसंगी सांगितले कि, "कोरोमंडल इंटरनॅशनलने एकाच वर्षात दहा नवीन उत्पादने सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे या संशोधित उत्पादनातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची आमची वचनबद्धता नाविन्यपूर्ण उपाय वितरीत करण्याच्या आमच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांमध्ये दिसून येते. जैविक उत्पादनाच्या या विस्तृत श्रेणीमुळे कोरोमंडल एकात्मिक पीक व्यवस्थापन दृष्टीकोन विस्तारला आहे, कापूस, तांदूळ, मिरची, सोयाबीन, कडधान्ये आणि भाजीपाला यासारख्या प्रमुख पिकांसाठी बियाण्यापासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना सर्वांगीण उपाय ऑफर करत आहे. कोरोमंडल कृषी नवकल्पनांमध्ये आघाडीवर आहे आणि शेतक-यांना अचूक शेती तंत्राद्वारे पीक व्यवस्थापन पद्धती अनुकूल करण्यासाठी मदत करण्यासाठी ड्रोन आधारित फवारणी आणि पीक निदान सेवा सुरू केल्या आहेत."