नियमित अपडेट

सदस्यता

ग्रुपमध्ये सामील व्हा
  • सदस्यता
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • होम
  • ज्ञान
  • संशोधन
  • ब्लॉग
  • व्यवसाय संधी
  • नोकरी संधी
  • संपर्क करा
  • सदस्यता

किडीवर अंदाजाने फवारणी नको! AI च्या मदतीने करा ४३६ प्रकारच्या किडीची ओळख

एटीएम न्यूज (नाशिक): शेतकरी (Farmers) मोठ्या मेहनतीने पीक (Crop) घेतो, मात्र त्याला अनेक वेळा पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावास (Pest Infestation) सामोरे जावे लागते. त्यात आता शेतातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच नेमकी कोणती कीड आहे आणि त्यावर काय उपाय करावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची (Technology) मदत घेता येणार आहे. केंद्र सरकारकडून National Pest Surveillance System (NPSS) या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा (Machine Learning) वापर केला जात आहे.

NPSS प्रणाली सध्या ७३ पिकांवरील ४३६ प्रकारच्या किडींची ओळख करण्यास सक्षम आहे. शेतकरी पिकावरील किडीचा फोटो घेऊन या प्रणालीच्या माध्यमातून तिची ओळख करण्यास मदत घेऊ शकतो. अशी माहिती केंद्र सरकारने (Central Government) संसदेत (Parliament) दिली आहे.  

आतापर्यंत ३५००० हुन अधिक कृषी सल्ले
AI आधारित ही प्रणाली खूपच उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत ३५,५६५ कृषी सल्ले (Agricultural Advice) देण्यात आले आहेत. किडीचा प्रादुर्भाव ओळखून वेळेत योग्य हस्तक्षेप करण्यास या प्रणालीची मदत होऊ शकते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अंदाजाने फवारणी (Spraying) करण्याऐवजी उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने किडीची ओळख करून उपाययोजना करण्याचा मार्ग शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. 

फवारणीपूर्वी किडीची अचूक ओळख करणे महत्त्वाचे 
पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावाने त्रस्त शेतकरी पिकावर एखादी कीड दिसली की अनेकदा अनुभव किंवा अंदाजाच्या आधारे कीटकनाशकाची (Pesticide) फवारणी करतात. मात्र प्रत्येक किडीसाठी एकच उपाय प्रभावी असेल असे नाही. चुकीच्या औषधाची किंवा अनावश्यक फवारणीमुळे उत्पादन खर्च वाढण्याबरोबरच पिकावर आणि पर्यावरणावरही (Environment) परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू शकतो.

अशा परिस्थितीत AI आधारित कीड ओळख प्रणाली शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र AI कडून मिळालेला सल्ला हा तज्ज्ञांच्या (Expert) सल्ल्याचा (Advice) पर्याय मानू नये, विशेषतः कीटकनाशकाची निवड आणि त्याचे प्रमाण ठरवताना कृषी अधिकारी (Agriculture Officer) किंवा कृषी तज्ज्ञांचा (Agricultural Expert) सल्ला घेणे आवश्यक आहे.

शेतीसाठी तंत्रज्ञानातून नवा दृष्टिकोन
केंद्र सरकार शेतीमध्ये उपग्रह (Satellites), ड्रोन (drones), रिमोट सेन्सिंग (remote sensing), GIS आणि AI यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे. पीक निरीक्षण (Crop monitoring), कीड-रोग व्यवस्थापन, हवामानविषयक माहिती आणि पीक विमा दाव्यांच्या पडताळणीसाठीही तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आधुनिक शेती साठी तंत्रज्ञान देखील आता आपला वाटा उचलत आहे.

Source: PIB

  • Aug 12, 2026
  • शेती


इतर बातम्या
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती

Share:

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp

Agri Trade Media(ATM) कृषी व्यापार आणि उद्योगांसाठी फायदेशीर सामग्री प्रकाशित करते जे जमिनीत कष्ट करणाऱ्या आणि गाळणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतात. आम्ही निर्माते आणि उत्पादक, डीलर्स आणि अर्थातच शेतकरी यांच्यातील पूल म्हणून काम करतो. शेतीवर दबाव वाढत आहे. हे प्रश्न शेतकरी, कृषी उद्योग आणि धोरणकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालत आहे.

वृत्तपत्र

कृपया आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

Useful Links

  • संशोधन
  • ज्ञान
  • शासन
  • जॉब ऑफर
  • सदस्यता
  • माहिती

Copyright © All rights reserved | Agro Trade Media

  • Terms of use
  • Privacy Policy
  • Contact