नियमित अपडेट

सदस्यता

ग्रुपमध्ये सामील व्हा
  • सदस्यता
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • होम
  • ज्ञान
  • संशोधन
  • ब्लॉग
  • व्यवसाय संधी
  • नोकरी संधी
  • संपर्क करा
  • सदस्यता

एडीएम - टेक्नोसर्व चा पुढाकार; महाराष्ट्रातील १५ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार शाश्वत शेतीचे प्रशिक्षण

एटीएम न्यूज (नाशिक): हवामान बदलांसह, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीसमोर उभ्या राहिलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू होत आहे. जागतिक कृषी क्षेत्रातील आघाडीची कंपनी एडीएम (ADM - Archer Daniels Midland) आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था टेक्नोसर्व (TechnoServe) यांच्या भागीदारीत राज्यातील १५ हजार नवीन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पुनरुत्पादक आणि शाश्वत शेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

एडीएम (ADM) च्या ‘फार्म फॉरवर्ड इनिशिएटिव्ह (Farm Forward Initiative)’ उपक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी एडीएम केअर्स (ADM Cares) या सामाजिक गुंतवणूक कार्यक्रमातून सुमारे ५ लाख अमेरिकन डॉलर (सुमारे ४.७५ कोटी रुपये) निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा १८ महिन्यांचा प्रकल्प महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये राबविला जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
या कार्यक्रमांतर्गत मुख्य भर मातीचे आरोग्य सुधारणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविणे, खतांचा आणि पीक संरक्षण उत्पादनांचा संतुलित वापर करणे तसेच शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम बनविणे यावर असेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माती आणि पाण्याच्या स्थितीचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या गरजेनुसार कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाईल.

२०० प्रात्यक्षिक प्लॉट, ८ FPO केंद्रे
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी दोन हंगामांमध्ये सुमारे २०० प्रात्यक्षिक प्लॉट उभारले जाणार आहेत. याद्वारे मृदा संवर्धन, जलसंधारण आणि उत्पादनक्षमता वाढविणाऱ्या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.

याशिवाय ८ शेतकरी उत्पादक संस्था (FPO) केंद्रे विकसित केली जाणार असून, ती शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन आणि सहाय्य केंद्र म्हणून काम करतील.

ड्रोन, सॅटेलाइट आणि डिजिटल तंत्रज्ञान
या प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या ‘महा-ॲग्रीटेक’ उपक्रमाशीही समन्वय साधला जाणार आहे. सॅटेलाइट आधारित माहिती, ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल ॲप्सच्या साहाय्याने शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल आणि शेत व्यवस्थापनाबाबत अचूक व तातडीची माहिती मिळणार आहे.

तसेच ‘महाविस्तार’सारख्या डिजिटल सल्लागार प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक कृषी मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्यावर भर
एडीएम इंडिया प्रमुख अमरेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, "शाश्वत पुरवठा साखळीची सुरुवात सक्षम आणि लवचिक शेतकरी समुदायापासून होते. टेक्नोसर्व च्या सहकार्याने आम्ही शेतकऱ्यांची हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता वाढविणे, मातीचे आरोग्य सुधारणे, तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण देणे आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविणे यासाठी काम करणार आहोत."

तर टेक्नोसर्व (TechnoServe) चे भारतातील राष्ट्रीय संचालक जॉयदीप दत्त यांनी सांगितले की, "लहान शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, ज्ञान आणि बाजारपेठेशी जोडल्यास कृषी क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि सक्षम शेती करण्यास मदत होईल."

शाश्वत शेतीचा नवा आदर्श
एडीएम (ADM)आणि टेक्नोसर्व (TechnoServe) यांच्या या संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्रात पुनरुत्पादक आणि शाश्वत शेतीचा प्रभावी नमुना उभा राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाच्या आव्हानांमध्येही उत्पादन वाढ, खर्चात बचत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

 Source : Archer Daniels Midland (Adm.com) & asiafoodjournal.com  

  • Jun 01, 2026
  • शेती


इतर बातम्या
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती
शेती

Share:

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp

Agri Trade Media(ATM) कृषी व्यापार आणि उद्योगांसाठी फायदेशीर सामग्री प्रकाशित करते जे जमिनीत कष्ट करणाऱ्या आणि गाळणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतात. आम्ही निर्माते आणि उत्पादक, डीलर्स आणि अर्थातच शेतकरी यांच्यातील पूल म्हणून काम करतो. शेतीवर दबाव वाढत आहे. हे प्रश्न शेतकरी, कृषी उद्योग आणि धोरणकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालत आहे.

वृत्तपत्र

कृपया आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

Useful Links

  • संशोधन
  • ज्ञान
  • शासन
  • जॉब ऑफर
  • सदस्यता
  • माहिती

Copyright © All rights reserved | Agro Trade Media

  • Terms of use
  • Privacy Policy
  • Contact