नियमित अपडेट

सदस्यता

ग्रुपमध्ये सामील व्हा
  • सदस्यता
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • ई पेपर्स
  • English
  • मराठी
  • होम
  • ज्ञान
  • संशोधन
  • ब्लॉग
  • व्यवसाय संधी
  • नोकरी संधी
  • संपर्क करा
  • सदस्यता

शिवराज सिंह चौहान यांनी केले ICAR ने तयार केलेल्या १८४ नवीन पीक वाणांचे अनावरण

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ने तयार केलेल्या १८४ नवीन पिक वाणांचे अनावरण NASC कॉम्प्लेक्समध्ये केले. यावेळी शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कृषी तज्ञ उपस्थित होते.

यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, भारताने उच्च उत्पादनक्षम बियांची तयारी करण्यात मोठं यश मिळवले आहे. १९६९ पासून भारतात ७२०५ पीक वाणांना मान्यता मिळाली आहे, ज्यामध्ये गेल्या ११-१२ वर्षांत ३२३६ नवीन वाणांचा समावेश झाला आहे.

या वाणांमध्ये पाणी कमी असताना सुध्दा उत्पादन देण्याची क्षमता आहे, हलक्या मातीमध्ये चांगलं वाढवणारी आणि रोग प्रतिकारक क्षमता असलेली विशेषता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे सोपे होईल.

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, भारत आता पोषणपूर्ण अन्न उत्पादनातही पुढे जाईल. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि लोकांना चांगलं आणि पौष्टिक अन्न मिळेल.

कार्यक्रमाच्या दरम्यान, राष्ट्रीय बियाणे निगम (NSC) कडून ३३.२६ कोटी रुपयांचा लाभांश चेक शिवराज सिंह चौहान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

नवीन वाणांची वैशिष्ट्ये:

- तांदूळ वाण : ६० नवीन वाण
- मक्का वाण : ५० नवीन वाण
- ज्वारी, बाजरी, नाचणी : नवीन वाण
- कडधान्य व तेलपीक वाण: १९ वाण
- कापूस, ऊस व जूट वाण: नवीन वाण

हे सर्व वाण ICAR च्या शास्त्रज्ञांनी विविध जलवायु, माती आणि कृषी पद्धतींचा विचार करून तयार केले आहेत. शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या आत या वाणांची उपलब्धता होईल.

  • Jan 06, 2026
  • शासन


इतर बातम्या
शासन
शासन
शासन
शासन
शासन
शासन
शासन

Share:

  • Facebook
  • Twitter
  • WhatsApp

Agri Trade Media(ATM) कृषी व्यापार आणि उद्योगांसाठी फायदेशीर सामग्री प्रकाशित करते जे जमिनीत कष्ट करणाऱ्या आणि गाळणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतात. आम्ही निर्माते आणि उत्पादक, डीलर्स आणि अर्थातच शेतकरी यांच्यातील पूल म्हणून काम करतो. शेतीवर दबाव वाढत आहे. हे प्रश्न शेतकरी, कृषी उद्योग आणि धोरणकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालत आहे.

वृत्तपत्र

कृपया आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

Useful Links

  • संशोधन
  • ज्ञान
  • शासन
  • जॉब ऑफर
  • सदस्यता
  • माहिती

Copyright © All rights reserved | Agro Trade Media

  • Terms of use
  • Privacy Policy
  • Contact